दुधनीतील परमशेट्टी प्रशालेच्या खो खो संघाला विजेतेपद:मैदानी स्पर्धेत 100, 200 मीटर धावणे तसेच रिलेत लक्ष्मी सोबानला तिहेरी मुकुट

2 hours ago 2
येथील फत्तेसिंह मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत दुधनी येथील एस. जी.परमशेट्टी प्रशालेतील खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी करत मैदानी व सांघिक खेळात उत्कृष्ट यश संपादन केले. सांघिक खेळात खो खो १७ वयोगट मुले व १४ वयोगट मुली विजेतेपद पटकाविले. १७ वयोगटात मुली उपविजेते ठरले. कबड्डीत १७ वयोगट मुली विजेता ठरल्या. १४ वयोगट मुली उपविजेता ठरल्या. १४ वयोगट मुले तृतीय क्रमांक पटकाविले. याबरोबर मैदानी स्पर्धेत १७ वयोगटात लक्ष्मी सोबान हिने १०० मीटर, २०० मीटर व १०० हर्डल्स मध्ये प्रथम क्रमांक पटकावून तिहेरी मुकुट मिळवले. पायल राठोड हिने ८०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे व रिलेत प्रथम क्रमांक पटकावले. गुरुशांत पावली यांनी ८०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक,४०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक तर सतरा वयोगट मुलींत लक्ष्मी कण्णी रिलेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावले. मुलात शुभम नुला, गुरुशांत पावली, अब्बास खैराट ,राकेश राठोड. यांनी रिलेत प्रथम क्रमांक पटकावले. शुभांगी नुला, पूजा राठोड, श्रावणी कांबळे रिलेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावले .या सर्व यशवंत खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा प्रमुख दत्तात्रय हिळळी, नागराज कलबुर्गी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य जयगुरुशांतलिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उपाध्यक्ष महांतेश देसाई, संस्थेचे सदस्य माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सातलिंगप्पा परमशेट्टी, राजशेखर गाडी, मुख्याध्यापक रेवणसिद्ध आलिगावे, पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article