दुर्गा विसर्जन मिरवणुकीत वर्ध्यात लाठीमार:चोपडा तालुक्यात फेकला दगडमिश्रित गुलाल, वर्ध्यात 10 वाजेनंतर डीजे बंद करण्याच्या पोलिसांच्या सूचनेमुळे तणाव

4 days ago 3
दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीची वेळ रात्री १० वाजेपर्यंत देण्यात आली असताना पोलिसांनी डीजेसह वाद्य बंद करण्याच्या सूचना दिल्याने वर्ध्यात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांकडून मंडळातील काही सदस्यांवर लाठीमार करण्यात आला. बोरगाव मेघे, सिंदी मेघे, सावंगी मेघे, पिंपरी मेघे रामनगर, म्हसाळा व आर्वी नाका या परिसरातील दुर्गामातेची विसर्जन मिरवणूक १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. यासाठी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंत परवानगी असताना डीजे व ढोल वाजवले जात असल्यामुळे ठाकरे मार्केट परिसरात पोलिसांनी डीजे बंद करण्याच्या सूचना दिल्याने मंडळ पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला असता राडा झाला. यामध्ये पोलिसांनी मिरवणुकीतील काही सदस्यांवर लाठीमार करण्यात आला. नंतर पोलिस बंदोबस्तात पवनार येथील धाम नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले. धानोऱ्यातील दगडफेकीत ६ जखमी, गावात तणाव धानोरा (ता. चोपडा) येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीला दगडमिश्रित गुलाल फेकल्याने सहा जण जखमी झाले. काही वेळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान, रात्री सव्वादहा वाजता मिरवणूक चोख बंदोबस्तात पार पडली. दोषींवर रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article