देवगिरी कारखान्यासह वैजापूर एमआयडीसी, कन्नड घाटातील बोगद्याच्या कामांचे आव्हान:सिल्लाेड, गंगापूर तालुक्यातील सिंचन प्रश्न कायम, पैठणला उद्यानाचे भिजत घाेंगडे
3 hours ago
1
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहा मतदारसंघांत माेठ्या प्रमाणावर सिंचन अनुशेषासह विविध प्रश्न प्रलंबित अाहेत. यात फुलंब्री येथील देवगिरी कारखाना बंद अाहे. वैजापुरात एमअायडीसीचे अद्याप भिजत घाेंगडे असून कन्नडची स्थिती सारखीच अाहे. एमअायडीसीसह शहराची पाणीपुरवठा याेजना, चाळीसगाव घाटातील बाेगदा तसेच प्रचारसभेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेली अाश्वासने नवर्निवाचित आमदारांकडून अाता पूर्ण हाेणार, अशी अपेक्षा मतदारांना लागून अाहे. पैठण येथील संत एकनाथ उद्यानाला निधी मिळूनही अद्याप कामेच सुरू अाहेत. उद्यान कधी सुरू हाेणार याविषयी सामान्यांना अाता उत्सुकता लागली अाहे. गंगापूर तालुक्यात हर घर नल याेजना अाली, मात्र त्याचेही काम संथगतीने सुरू अाहे. सिंचनाचा प्रश्न माेठ्या प्रमाणावर तालुक्याला भेडसावत असल्याची स्थिती गेल्या तीन दशकांपासून कायम अाहे. सिल्लाेड तालुक्यात सिंचन, बंधाऱ्यांसाठी माेठ्या प्रमाणावर निधी अाला असून ही कामे रखडलेली अाहेत. ही कामे नवीन लाेकप्रतिनिधी पूर्ण करणार का? याकडे मतदारांचे लक्ष लागले अाहे. हे प्रश्न पुन्हा नवनिर्वाचित अामदारांच्या कार्यकाळात प्रलंबितच राहतात की मार्गी लागतात, याकडे अाता सामान्यांचे लक्ष लागले अाहे. सहा मतदारसंघांमध्ये काही प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. हे प्रश्न कधी मार्गी लागणार याकडे आता तालुक्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे. कन्नड : पाणीपुरवठा, बाेगद्याचाप्रलंबित प्रश्न मार्गी लागणार कन्नड शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ५३कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला अाहे.अाता काम सुरू हाेण्याची प्रतीक्षा अाहे.चाळीसगाव घाटात बाेगद्याचा प्रश्न प्रलंबितअसून हा लवकरच सुटण्याची अपेक्षा अातासामान्य मतदारांना लागून अाहे. शेतकऱ्यांसाठीफूड प्रोसेसिंग युनिट सुरू करण्यात येईल, शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यात येईल,आश्वासने पूर्ण होणार. पैठण : संत ज्ञानेश्वर उद्यान, इतरकामांकडे सामान्यांचे लागले लक्ष पैठण मतदारसंघात अनेक प्रश्न गेल्या काहीवर्षांपासून रखडलेले अाहेत. त्यात संतज्ञानेश्वर उद्यानाची कामे दोन वर्षांपासूनसुरू अाहेत. मात्र अद्यापही उद्यान बंद अाहे.५० कोटी खर्च करून भूमिगत गटार योजना१३ वर्षांपासून रखडलेली असून ब्रह्मगव्हाणयोजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील योजनेचीकामेही रखडली अाहेत. वैजापूर : एमआयडीसीप्रकल्पाची आता प्रतीक्षा तब्बल २५ वर्षे शेतकऱ्यांच्या तीव्रविरोधामुळे रखडलेले औद्योगिकविकासाचे चक्र आता गतिमान करण्याची जबाबदारी आ. बोरनारेयांच्यावर आहे. राज्यातील नव्यासरकारमधील सत्ताधारी गटाचेलोकप्रतिनिधी या नात्याने मार्गीलावण्याचे आव्हान त्यांच्यासमोरउभे राहिले आहे. औद्योगिकवसाहत सुरू झाल्यास प्रत्यक्ष वअप्रत्यक्ष अशा दोन्ही घटकांच्याअर्थकारणाची बाजारपेठेत मोठीउलाढाल होईल. गंगापूर : सिंचनाचा भेडसावणाराप्रश्न अाता मार्गी लागणार काॽ गंगापूर तालुक्यात गोदावरी पट्ट्यातीलवीस-पंचवीस गावांचा अपवाद सोडला तरजवळपास दोनशेवर गावांमध्ये सिंचनाचा प्रश्नकायम आहे. सिल्लेगाव प्रकल्प पूर्ण होउन२५-३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनहीपूर्ण कालावधीत केवळ दोन वेळा त्यामध्येपाणी आले. वरील दोन्ही प्रकल्पांमध्येजायकवाडीमधून पाणी लिफ्ट करण्यासाठीअनेक वर्षांपासून जलआंदोलने झाली. सिल्लाेड : बंधाऱ्यांना निधी कधी?
तालुक्यात शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळावे म्हणून पूर्णानदी वर मंजूर करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यासाठीआवश्यक निधी आणून हे बंधारे पूर्ण होणे आता या नवीनमंत्रिमंडळाकडून अपेक्षित आहे. या बंधाऱ्यामुळेतालुक्यातील मोठे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. फुलंब्री : देवगिरी कारखाना सुरू करण्याचे आश्वासन फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखरकारखाना गेल्या १३ वर्षांपासून बंद आहे.हा कारखाना लवकरच सुरू करणारअसे नवनिर्वाचित आमदार अनुराधाचव्हाण यांनी प्रचारादरम्यान सांगितलेहोते. त्यामुळे आता कारखाना कामगारव तालुकावासीयांच्या अपेक्षा वाढल्याआहेत. परिणामी ऊस उत्पादकशेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामनाकरावा लागत आहे. या कारखान्यातकाम करणाऱ्या कामगारांसहपरिसरातील व्यावसायिकांनाही हाकारखाना सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)