देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात:तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान

2 hours ago 1
आजपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा देशभरात जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे.पहाटेच नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान झाली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देखील जयत तयारी करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेल्याचे चित्र आहे. राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. मंदिर गर्दीने फुलले.. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. देवीच्या गाभाऱ्यात दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात येणार आहे. पहाटेच मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान झाली असून पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देवीच्या विविध अलंकार पूजेसह रोज रात्री छबिना निघणार आहे. राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. त्यामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेल्याचे चित्र आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे. नवरात्र उत्सवाची पहिली माळ आहे. पहाटेपासूनच अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. माहूर गडावर नवरात्रोत्सवाला प्रारंभ नांदेड जिल्ह्यातील श्री रेणुका मातेच्या माहूर गडावर देखील नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. नऊ दिवस माहूर गडावर श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात.मंदिर संस्थानकडून नऊ दिवस गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परभणीत नवरात्र महोत्सवात श्री दुर्गा माता दौड शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत 03 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी शहरासह तालुका तसेच विविध गावांमधून सलग नऊ दिवस सकाळी 5.45 वाजता ही दौड निघणार आहे. नऊ दिवसांचे एकत्रित जमण्याच्या ठिकाणाचे वेळापत्रकही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने निश्‍चित केले असून 03 ऑक्टोंबर रोजी गांधी पार्क, 04 ऑक्टोंबर माऊली मंदिर विद्या नगर, 05 ऑक्टोंबर सद्गुरु नगर जूना पेडगाव रोड, 06 ऑक्टोंबर श्री स्वामी समर्थ केंद्र सिंचन नगर, 07 ऑक्टोंबर गणपती चौक जिंतूर रोड, 08 ऑक्टोंबर स्व. बाळासाहेब ठाकरे कमान, 09 ऑक्टोंबर श्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय, 10 ऑक्टोंबर देशमुख हॉटेल कारेगाव रोड, 11 ऑक्टोंबर छत्रपती शिवाजी चौक सुभाष रोड व 12 ऑक्टोंबर शनिवार रोजी अष्ठभुजा देवी मंदिर ठिकाणी एकत्र येवून विजयादशमीच्या दिवशी महादौड काढण्यात येणार असून दुर्गामाता दौडने याचा समारोप होणार आहे. सकाळी 5.45 वाजता दौड काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शंकर देशमुख यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article