देशी कंपनीने 50MP कॅमेऱ्याचा फोन लॉंच केला,फिचर्स भन्नाट आणि किंमत इतकी कमी

1 hour ago 2

देशी स्मार्टफोन बनविणारी कंपनी लावाने आपला नवा स्मार्टफोन लॉंच केला आहे. कंपनीने Lava Yuva 4 लॉंच केलेला आहे. हा एक एन्ट्री लेव्हल डीव्हाईस आहे. यात तुम्हाला HD+ डिस्प्ले मिळत आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट सह येतो. हा फोन Unisoc T606 प्रोसेसर सह बाजारात आला आहे. हा फोन एण्ट्री लेव्हल युजर्ससाठी तयार केलेला आहे.यात तुम्हाला 5000mAh बॅटरी आणि 50MPचा रिअर कॅमेरा मिळत आहे. याची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये पाहूयात…

लावाचा हा फोन केवळ एक कॉन्फिग्रेशनमध्ये आला आहे. याच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे. तुम्हाला ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी पर्पल आणि ग्लॉसी ब्लॅक कलरमध्ये मिळेल. फोनची ही किंमत शुभारंभाची प्राईज आहे.म्हणजे नंतर या फोनची किंमत वाढणार आहे. तुम्ही या फोनला लावा रिटेल आऊटलेटमध्ये खरेदी करु शकता. या फोनला एक वर्षाची वॉरंटी आहे. तसेच ब्रंड फ्री सर्व्हीस एट होमची ऑफर देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घरबसल्या सर्व्हीस दिली जाणार आहे.

स्पेसिफिकेश काय ?

Lava Yuva 4 मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले मिळत आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर Unisoc T606 प्रोसेसर मिळत आहे. हा काही पॉवरफूल प्रोसेसर नसला तरी तुमची रोजची कामे करु शकतो.

हे सुद्धा वाचा

50MP चा मुख्य कॅमेरा

हा स्मार्टफोन 4GB RAM + 64GB स्टोरेजसह उपलब्ध होत आहे. यात तुम्हाला 128GB स्टोरेज मिळतो. परंतू कंपनीने या व्हेरीएंटच्या किंमतीचा उलगडा नाही केला आहे. हॅंडसेट स्टोरेजला 512GB पर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने एक्सपांड करता येते. या डुएल सिमचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. ज्याला एलईडी फ्लॅश आहे.तर 8MPचा फ्रंट सेल्फी कॅमेरा दिलेला आहे. सुरक्षेसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील दिलेला आहे. यात 3.5 mm चा ऑडीओ जॅक आणि fm vigor देखील आहे. लक्षात असू द्या की हा एक 4G डिव्हाईस आहे. त्यावर तुम्हा 5G सेवा मिळणार नाही. हा स्मार्टफोन USB Type-C पोर्टसह मिळतो. हॅंडसेटमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. जी 10w च्या चार्जिंगला सपोर्ट करते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article