शेअर बाजारात पुन्हा त्सुनामी; Sensex 1190 तर Nifty 360 अंकांनी आपटला, कारण तरी काय?

2 hours ago 2

भारतीय शेअर बाजाराला गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरतेने घेरले आहे. कोणत्याही बातमीचा, घडामोडींचा लागलीच बाजारावर परिणाम होतो. चढउताराच्या या सत्राने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. सकाळी तेजीत असलेला बाजार व्यापारी सत्राच्या मध्यापर्यंत चांगली कामगिरी करत होता. पण दुपारनंतर धडाधड शेअर कोसळायला लागले. शेअरमध्ये विक्रीचे सत्र सुरू झाले. अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम दिसून आला. अमेरिकन केंद्रीय बँक फेड रिझर्व्हच्या व्याज दराबाबतचे धोरण, आयटी क्षेत्रातील विक्री यामुळे शेअर बाजार गडगडला. Sensex आणि Nifty घसरून 24 हजारांहून खाली आला. गुंतवणूकदारांना पुन्हा फटका बसला.

Sensex च्या 30 मधील इतके शेअर लाले-लाल

सेन्सेक्सच्या 30 शेअरच्या चार्टमध्ये मोठी उलथापालथ दिसली. 30 पैकी 29 शेअर लाल रंगात न्हाऊन निघाले. या घसरणीच्या लाटेत केवळ एसबीआयचा शेअर तेवढा टिकला. या शेअरमध्ये आज 0.59 टक्क्यांची तेजी दिसली. तर Nifty 50 शेअर चार्टवर नजर टाकल्यास यामधील 4 कंपन्यांचे शेअर सोडून 46 कंपन्यांचे शेअर लाले लाल झाले आहेत. Nifty 50 मध्ये ज्या शेअरमध्ये तेजी दिसत आहे, त्यात ADANIENT, SHRIRAMFIN, SBIN आणि CIPLA या कंपन्यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

किती घसरले मार्केट कॅप?

BSE च्या सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे मार्केट कॅपमध्ये आज घसरण दिसली. 1.52 लाख कोटी रुपयांचा फटका बसला. आता मार्केट कॅप 442.96 लाख कोटी रुपयांवर घसरले. अमेरिकेतील महागाईचा आकड्यांमुळे व्याज दरात कपात होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आयटी शेअरमध्ये 4% पर्यंत घसरणी झाली. निफ्टी आयटी इंडेक्समध्ये 2.3% घसरण आली आहे. एलटीटीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक या शेअरमुळे ही घसरण ओढावली.

तर दुसरीकडे अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये 9.3% पर्यंतची उसळी आली. गेल्या आठवड्यात त्यांच्या काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर आरोप लावण्यात आले होते. त्यावर समूहाने पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकन अधिनियमाचे कोणतेही उल्लंघन झाले नाही असा दावा कंपनीने केला आहे.

अदानींच्या या शेअरमध्ये तेजी

अदानी एनर्जी सोल्यूशन्स आणि अदानी टोटल गॅसला सर्वाधिक फायदा झाला आहे. या कंपन्या क्रमशः 9% आणि 9.3% वाढल्या आहेत. तर अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये 8.3% उसळी आली आहे. हा शेअर दिवसभरात 1,072 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला आहे. तर अदानी पॉवर, अदानी इंटरप्रायजेज, अदानी विल्मर आणि अदानी पोर्ट्स शेअरमध्ये 5% पर्यंत उसळी दिसून आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article