बीड : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

2 hours ago 2

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

28 Nov 2024, 1:22 pm

Updated on

28 Nov 2024, 1:22 pm

केज : सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी केज पोलिसांनी एका माथेफिरू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २७ नोव्हेंबर रोजी केज पोलीसांना माहिती मिळाली की, एका माथेफिरूने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर मुस्लिम समाजाच्या भावना भडकविणारी पोस्ट व्हायरल केली आहे. त्याची माहिती पोलीस जमादार श्रीकांत चौधरी यांनी प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना दिली. त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी तपास करून माहिती घेतली असता सदर तरुण हा केज शहरातील अहिल्यादेवी नगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. सचिन सदाशिव मनेरी असे त्याचे नाव आहे.

त्या नंतर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशाने सचिन मनेरी याला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article