अंबाजोगाई परिसरातील बुट्टेनाथ परिसरातील डोंगरदऱ्यात गेल्या दहा वर्षापासुन बिबट्याचा वावर आहे अशी चर्चा आहे. पण काल बिबट्याने अंबाजोगाई तालुक्यातील पुस आणि जवळगाव शिवारात अचानक आपले दर्शन दिल्यामुळे या परीसरात खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई शहरालगत असलेल्या बुट्टेनाथ परिसरातील डोंगरदऱ्यात गेली दहा वर्षांत या विभागातील नागरीकांनी अनेकदा बिबट्या पाहिला. या बिबट्याने अनेकवेळा म्हशी, शेळ्यांचा फडशा पाडल्याचा बातम्याही प्रसिद्ध झाल्या. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावला होता. मागील काही वर्षे बिबट्या दर्शनाची चर्चा बंद झाली होती. मात्र, बुधवारी रात्री जवळगाव-पुस शिवारात बिबट्या ऊसाच्या फडातून बाहेर निघातानाचे दृष्य अनेक शेतकर्यांनी पाहिले आणि गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. याच परिसरातील तेलघणा शिवारातही बिबट्याच्या पावलांची ठसे हरभर्याच्या पिकात उमटल्याची चित्रफित अलिकडेच व्हायरल झाल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रत्यक्ष बिबट्यानेच दर्शन दिले असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात बालाघाटच्या डोंगरदर्यात मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या संपूर्ण परिसरात वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. दहा वर्षापूर्वी बुट्टेनाथ परिसरात जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाने जेरबंद केला होता. या नंतर मात्र येल्डा परिसरात दिसलेल्या बिबट्याला वनविभागाने जाळे लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या तावडीतून देखील तो सुटला. या घटनेला बराच काळ लोटल्यानंतर पुन्हा एकदा अंबाजोगाई तालुक्यात बिबट्या सक्रिय झाल्याचे शेतकर्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी वनविभागाला दुरध्वनीवरून संपर्क साधून बिबट्याच्या वावराची कल्पना दिली. त्यानूसार अंबाजोगाईचे वनपाल अधिकारी विजया शेंगोटे यांनी त्यांच्या पथकासह पुस व जवळगाव परिसरात जावून त्या भागाची पाहणी केली. तसेच तेथील शेतकर्यांना भितीचे कारण नाही असे सांगुन बिबट्या दिसताच वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी दोन्ही गावातील शेतकर्यांना केला. स्वरक्षणासाठी साहित्य वापरावे पुस व जवळगाव शिवारात बिबट्याच्या पावलाचे ठसे उमटल्याचे निदर्शनास आले आहे. या भागात बिबट्या असल्याची दाट शक्यता आहे. शेतकर्यांनी स्वरक्षणासाठी शेतात जाताना कुर्हाड, विळा, गोफन, कोयता, काट्या या वस्तुंचा वापर करावा. तसेच बिबट्या दिसताच वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन वनपाल अधिकारी विजया शिंगोटे यांनी केले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)