रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक; तिघांचा मृत्यू

2 hours ago 2

मृत हर्षद संदीप दंडावार, साहिल नंदू गणेशकर, साहील अशोक कोसमशीले File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

28 Nov 2024, 3:34 pm

Updated on

28 Nov 2024, 3:34 pm

चंद्रपूर : दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दिलेल्या जबर धडकेत तिघा युवकांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा भीषण अपघात सावली तालुक्यातील बोथली- हिरापूर रोड मार्गावरील मार्कंडेय विद्यालयापुढे घडला. हर्षद संदीप दंडावार (वय 18 रा. बोरचांदली ता. मूल), साहिल नंदू गणेशकर (वय 20, रा. भंगराम तळोधी) तर साहील अशोक कोसमशीले (वय 21 रा. बोथली) अशी मृत्तांची नावे आहेत.

सावली तालुक्यातील बोथली- हिरापूर मार्गावरील मार्कंडेय विद्यालयापुढे शेतातून काम करून आल्यानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. हर्षद संदीप दंडावार,साहिल नंदू गणेशकर, साहील अशोक कोसमशीले हे तिघेही भरधाव वेगाने जात असतानाच दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक बसली.

अपघात एवढा भीषण होता की, हर्षद दंडावार या युवकाचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी साहील कोसमशीले व साहिल गणेशकर या दोघांना गडचिरोली येथील रुग्णालयात नेताना साहिल गणेशकर या युवकाचा वाटेतच तर साहिल कोसमशिले या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघेही युवक युवक हिरापूर येथे नाटक पाहण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. मृतक तिघेही युवक गोंडपिपरी तालुक्यातील होते. अपघातानंतर पोलिसांनी अपघातस्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. तिघा युवकांच्या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article