अहमदपूर (Teacher household suicide) : अहमदपूर शहरात एका खाजगी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करणाऱ्या एका शिक्षकाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नजीक रेल्वे पटरीवर आपल्या कुटुंबीयांसह आत्महत्या केली. या घटनेने अहमदपूर शहर परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अहमदपूर तालुक्यातील किनी कदू येथील शिक्षकांने पत्नी व मुलीसह गंगाखेड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या धारखेड शिवारात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील एका खाजगी विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मसनाजी सुभाष तुडमे (रा. किनी कद्दू तालुका अहमदपूर जिल्हा लातूर) हे हल्ली गंगाखेड येथे मुक्कामी राहतात. मात्र त्यांनी पत्नी (Teacher household suicide) व मुलीसह गंगाखेड रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या परभणी रेल्वे मार्गावर धारखेड शिवारातील रेल्वे पटरीवर आत्महत्या केली. ही प्राथमिक माहिती पोलिसांनी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी धावले.
दरम्यान शिक्षक मसनाजी सुभाष तुडमे व कुटुंबीयांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्यापही स्पष्टता झाली नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आसिफ शेख, जमादार दीपक वाबळे व गंगाखेडचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
मयत मसनाजी तुडमे यांच्या खिशात असलेला मोबाईल वरून नातेवाईकांना फोन करत सदर इसमाची ओळख पटवली सदर घटना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान रेल्वे मालगाडी येत असताना रेल्वे पटरीवर तिघांनी झोपून आत्महत्या केली असल्याचे गंगाखेड पोलिसांनी सांगितले. त्यांच्या या आत्महत्येमुळे किनी कदु गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.