हातात संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतली
नवी दिल्ली () : प्रियांका गांधी यांनी हिंदीतून खासदारपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधींप्रमाणेच संविधानाची प्रत हातात धरली होती. केरळमधील वायनाडमधून निवडणूक जिंकल्यानंतर प्रियंका गांधी आज गुरुवारी पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचल्या. त्यांना खासदार म्हणून शपथ देण्यात आली. प्रियांकाने हिंदीतून शपथ घेतली.
प्रियंका संसदेत Parliament 2024 पोहोचल्यावर काँग्रेस नेत्यांनी त्यांचे बाहेर स्वागत केले. संसदेत प्रियांकाने हातात संविधानाची प्रत घेऊन हिंदीत शपथ घेतली. प्रियंका खासदार झाल्याबद्दल आई सोनिया गांधी म्हणाल्या की, “We are each precise blessed and proud… (आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही सर्व खूप आनंदी आहोत…)”
केरळची प्रसिद्ध ‘कसावू’ साडी नेसून प्रियांका संसदेत (Parliament 2024) पोहोचली. राहुल आणि सोनिया यांच्यासोबत प्रियंकाचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील संसदेत उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर प्रियांकाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खर्गे यांचे आशीर्वाद घेतले. पहिल्यांदाच गांधी घराण्यातील तीन सदस्य संसदेत उपस्थित आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल हे उत्तर प्रदेशातील रायबरेलीचे खासदार आहेत आणि प्रियांका केरळमधील वायनाडमधून खासदार आहेत. तर सोनिया राजस्थानमधून राज्यसभा सदस्य आहेत.