तुम्हाला या देशात येईल श्रीमंत असल्याचा अनुभव, 1 रुपयाच्या बदल्यात मिळते 500 ची नोट

2 hours ago 2

भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मागे असला तरी असे अनेक देश आहेत जिथे भारतीय रुपयांना मोठी किंमत आहे. जेथे डॉलर वापरला जातो तेथे भारतीयांना अधिक पैसे मोजावे लागतात. पण आम्ही आज तुम्हाला असा देश सांगणार आहोत जेथे तुम्हाला 100 रुपयांची नोट घेऊन गेलात, तर तुम्ही वस्तूंनी भरलेली बॅग घेऊन परत याल.

जगात सध्या अनेक देशांमध्ये महागाई खूप आहे. घर चालवण्यासाठी पगार कमी पडतोय. पैशाची किंमत कमी होतेय. तुम्ही १०० रुपये घेऊन बाजारात गेलात तरी त्याच खूप काही येत नाही. रुपया अमेरिकन डॉलरसमोर हतबल आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे आपला रुपया खूपच मजबूत स्थितीत आहे.

व्हिएतनाममध्ये रुपया मजबूत

व्हिएतनाममध्ये भारताच्या एक रुपयाची किंमत 300.41 डोंग आहे. डोंग हे व्हिएतनामी चलन आहे. जर तुम्ही व्हिएतनामला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कमी बजेटमध्येच टूर करू शकता.

इराणमध्ये ही रुपयाची ताकद

इराणमध्ये देखील रुपयाची ताकद बघायला मिळते. एक रुपयाची नोटची किंमत 497.94 इराणी रियाल आहे. म्हणजेच, तुमच्या खिशात 100 रुपयांची नोट असेल तर तुम्हाला 49,791.51 इराणी रियाल मिळतील. याचा अर्थ भरपूर खरेदी करण्याची संधी आहे.

लाओसला भेट देण्याचा फायदा

लाओस हा आशिया खंडातील एक देश आहे. हा देश नैसर्गिक संसाधने आणि नैसर्गिक सौंदर्याने नटला आहे. येथे घनदाट जंगले आहेत येथील निळे आकाश यासाठी प्रसिद्ध आहे. या देशात देखील भारतीय रुपया खूप मजबूत स्थितीत आहे. 1 रुपयाच्या बदल्यात येथे 260.51 लाओ किप मिळते.

इंडोनेशियाची स्वस्त ट्रिप

इंडोनेशिया हा देश निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आहे. येथील द्वीपसमूहात 17,000 पेक्षा जास्त बेट आहेत. हे जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. तर तुम्हाला येथे जायचे असेल तर तुम्हाला जास्त बजेटची गरज नाही. येथे 1 रुपयाची किंमत 187.32 इंडोनेशियन रुपिया आहे.

या देशात एक रुपयाची किमंत जास्त

श्रीलंकेत देखील भारतीय रुपया मजबूत आहे. येथे एक रुपयाची किंमत 3.47 श्रीलंकन ​​रुपये आहे. दक्षिण कोरियामध्ये, एक रुपया 16.69 दक्षिण कोरियन वॉन आहे. हंगेरीमध्ये एका रुपयाला ४.६९ हंगेरियन फॉरिंट्स मिळतात, तर कंबोडियामध्ये एक रुपयाच्या बदल्यात 48.3 कंबोडियन रिल्स मिळतात.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article