आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाचे चित्र पोस्ट केले आहे. (Image source- X)
Published on
:
08 Feb 2025, 9:54 am
Updated on
:
08 Feb 2025, 9:54 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठा हादरला बसला असून, तब्बल २७ वर्षांनंतर भाजपने राजधानीतील विधानसभेवर भगवा फडकवला आहे. या निकालानंतर जुन्या मित्रपक्षांसह सहकाऱ्यांनी आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाचे चित्र पोस्ट करत 'आप'वर निशाणा साधला आहे.
खोट्या आश्वासनांवर लोकांनी विश्वास ठेवला नाही
आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच आपच्या राज्यसभा सदस्य मालीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाचे चित्र पोस्ट केले आहे. यानंतर 'ANI'शी बोलताना मालीवाल म्हणाल्या की, "आपण इतिहास पाहिला तर महिलेसोबत गैरवर्तन करणार्यांना देवाने शिक्षा केली आहे. जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि रस्त्यांची स्थिती यासारख्या समस्यांमुळेच अरविंद केजरीवाल स्वतः आपली जागा गमावली आहे. आद आदमी पार्टीच्या नेत्यांना वाटत होते की, आपल्या खोट्या आश्वासनांवर लोक विश्वास ठेवतील. आपल्या मताप्रमाणेच लोकांनी वागावे, असाही त्यांचा आग्रह होता. त्यामुळेच लोक त्यांच्यापासून दूर गेले. विधानसभा निवडणुकीतील विजयानिमित्त मी भाजपचे अभिनंदन करते. लोकांनी त्यांना मोठ्या आशेने मतदान केले आहे. त्यांनी जनतेची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करावे."
मालीवाल यांनी केले होते केजरीवालांच्या 'पीए'वर गंभीर आरोप
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या ड्रॉईंग रूममध्ये वाट पाहत असताना केजरीवाल यांचे वैयक्तिक सचिव विभव कुमारांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप स्वाती मालीवाल यांनी केला होता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. पक्षाचे दिग्गज नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. पक्षाला केवळ २२ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर भारतीय जनता पक्षाने ४८ जागांवर आघाडी कायम ठेवली होती.