सध्या अनेक कारणांनी चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीबाबत रोजच नवीन काहीना बातम्या येतच असतात. पण जेव्हा ममता कुलकर्णी दुबईहून 25 वर्षांनी भारतात परतली होती तेव्हा तिच्या येण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
भारतात आल्यानंतर ममताने एक व्हिडीओही केला होता ज्यात ती खूप भावूक झालेली पाहायला मिळाली. मात्र आता ममताप्रमाणेच अजून एक अभिनेत्री तब्बल 14 वर्षांनी भारतात परतली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री 14 वर्षांनी भारतात
अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीने काम केले आहे. ती सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर, सुनील शेट्टी यांच्या सुपरहिट चित्रपटमध्येही दिसली आहे. त्यांची कोस्टार राहिली आहे.
अलीकडेच, सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर करत सांगितलं की ती 14 वर्षांनी मुंबईत परतली आहे. इतक्या दिवसांनी ती भारतात का आली आहे? याची सर्वच चाहत्यांना उत्सुकता होती. ही अभिनेत्री म्हणजे सेलिना जेटली. सेलिना अचानक एवढ्या वर्षांनी भारतात का परतली आहे.
सेलिना जेटलीने मिस इंडियाचा ताज जिंकला होता
हे फार कमी जणांना माहित असेल की सेलिना जेटलीने मिस इंडियाचा ताजही जिंकला होता. त्यानंतर सेलिनाने 2003 मध्ये आलेल्या ‘जानशीन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात तिच्या विरुद्ध फरदीन खान होता.
हा चित्रपट पडद्यावर काही खास कामगिरी करू शकला नाही पण लोकांना त्याची गाणी आवडली. यानंतर सेलिना अनेक चित्रपटांमध्ये दिसली पण ती आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर छाप सोडू शकली नाही. मात्र काही चित्रपटांनंतर तिने एका परदेशी उद्योगपतीशी लग्न केले आणि ती फिल्मी जगापासून दूर गेली.
सेलिना जेटली भारतात का परतली?
सेलिनाने अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूडमध्ये मोजकेच चित्रपट केले मात्र त्या चित्रपटांच्या माध्यमातूनही तिने आपली एक खास ओळख बनवली. दरम्यान सेलिना जेटलीने तिचं भारतात येण्याचं कारण सांगणारी पोस्ट करत म्हटलं आहे की ती कामासाठी भारतात आली आहे.
याचा अर्थ असा की आपण तिला पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये पाहू शकतो. सेलिनाने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, “ मी कामासाठी भारतात आले आहे. इंग्लिश बाबू देसी मेम: 14 वर्षे परदेशात प्रवास केल्यानंतर, मी फक्त कामासाठी परत आली आहे #aamchimumbai.”
“इंग्रजी भाषेतील उच्चार बदललेला नाही…”
पुढे ती म्हणाली, “काही लोक चार दिवसांच्या सुट्टीवर जातात आणि त्यांचे बोलण्याचे स्वर बदलतात. तो परत येतो तेव्हा जणू काही त्याने ऑक्सफर्डमध्ये वर्षे घालवली असतील किंवा न्यू यॉर्कमध्ये राहिला असेल.
तथापि, 14 वर्षे सिंगापूर, दुबई आणि युरोपमध्ये राहूनही माझ्या इंग्रजी भाषेतील उच्चार बदललेला नाही. खरंतर, ऑस्ट्रियामध्ये जर्मन बोलल्याने माझ्या इंग्रजीवर निश्चितच परिणाम झाला आहे.”
“आता मुंबईत परतल्यानंतर….”
सेलिनाने पोस्टमध्ये शेवटी लिहिले की, “आता मुंबईत परतल्यानंतर, मी माझ्या मित्रांना इंग्रजी बातम्या वाचणाऱ्यांसारखे इंग्रजी बोलताना ऐकते. हे पाहून, मी कुठे चुकले याचा विचार करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.” सेलिनाने अद्याप तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल किंवा आगामी प्रकल्पांबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.”