नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा सफाया झाला. त्याचवेळी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य फोडता आला नाही. त्याचवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला घेरले आहे. त्याचवेळी काँग्रेस त्यांच्या आघाडीतील पक्षांना संपवण्याचे कसे काम करत आहे, हे सांगून इंडिया आघाडीला सावध केले.
काँग्रेसला पराजयाचे गोल्ड मेडल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यालयात विजय उत्सावात जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांचे नाव न घेता सांगितले की, काही वर्षांपूर्वी त्यांनी हिंदू असण्याचा ढोंग केला. सर्वत्र मंदिर-मंदिर फिरले. परंतु जनतेने त्यांना ओळखले होते. आता दिल्ली निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा संदेश दिला. निवडणुकीत काँग्रेसने शून्याची डबल हॅट्ट्रिक केली आहे. देशाच्या राजधानीत देशातील सर्वात जुन्या पक्षाचा आपले खातेही उघडता येत नाही. हे लोक स्वत:ला पराजयाचे गोल्ड मेडल देऊन फिरत आहेत.
सहकारी पक्षांना काँग्रेसने संपवले
काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, देशाचा आता काँग्रेसवर विश्वास राहिला नाही. गेल्यावेळी मी म्हटले होते की, काँग्रेस एक परजीवी पक्ष आहे. स्वत: डुबते आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनाही डुबवते. काँग्रेस एकामागून एक आपल्या सहकाऱ्यांना संपवत आहे. त्यांची पद्धत मजेशीर आहे. काँग्रेस आपल्या सहकाऱ्यांची जी भााषा आहे. त्यांचा अजेंडा चोरते. त्यांचे मुद्दे चोरते आणि त्यांच्या व्होट बँकेला लुटतो. उत्तर प्रदेशातही समजवादी पक्षाला आणि बहुजन समाजवादी पक्षाचे मतदार चोरले. परंतु काँग्रेला मुलायम सिंह यादव यांनी ओळखले होते. ते अखिलेश यादवा यांना ओळखता आले नाही. आता तामिळनाडूत काँग्रेस डिएमकीची भाषा बोलत आहे. कारण त्यांना जमीन तयार करायची आहे. बिहारमध्ये जातीयवादाचे विष पसरवले. जम्मू-काश्मीर आणि बंगालमध्ये काँग्रेसने तेच केले. दिल्लीत काँग्रेस ज्यांचे हात पकडते त्यांची वाट लावते, हे सिद्ध केले.
हे सुद्धा वाचा
काँग्रेस आपल्याला संपवत आहे, हे त्यांच्या सहकारी पक्षांना कळत आहे. तसेच इंडिया आघाडीवाल्यांना ते कळत आहे. जी व्होट बँक आपण मिळवली तीच व्होट बँक काँग्रेस खाण्याचा प्रयत्न करत असल्याचे इंडिया आघाडीच्या लोकांच्या लक्षात आले. त्यामुळेच दिल्लीत इंडिया आघाडीचे सर्व लोक दिल्लीत काँग्रेसच्या विरोधात उतरले होते. त्यांना काँग्रेसने लुटलेली मते मिळवायची होती, असे नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला करताना सांगितले.
ती काँग्रेस आता नाही…
देशात आज जी काँग्रेस आहे ती पूर्वीची काँग्रेस नाही, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या काळात जी काँग्रेस होती ती आज नाही. आज काँग्रेस देशहिताची नाही तर अर्बन नक्षल्यांची चिंता आहे. त्यांच्यासाठी राजकारण काँग्रेस करत आहे. काँग्रेसचे नेते म्हणतात, भारताशी लढतोय. इंडियन स्टेटसची लढत आहे. ही नक्षलवाद्यांची भाषा आहे. समाज आणि देशात अराजकता निर्माण करणारी भाषा आहे.
हे ही वाचा…
शॉर्टकट राजकारणाचे जनतेने ‘शॉटसर्किट’ केले…नरेंद्र मोदी यांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला