पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्म वर्षानिमित्त चौंडी येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.Pudhari Photo
Published on
:
08 Feb 2025, 5:34 pm
Updated on
:
08 Feb 2025, 5:34 pm
जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्म वर्षानिमित्त (चौंडी ता.जामखेड, जि.अहिल्यानगर) येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी ९ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत होणाऱ्या परिषदेला देशभरातील ४०० कर्तृत्ववान महिलांचा सहभाग असेल, अशी माहिती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी दिली.
२०२५ हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दीचे वर्ष आहे. आहे. या निमित्ताने त्यांचे जन्मगाव चौंडी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी समारोह समितीकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलपती डॉ. श्रीमती शांतिश्री पंडित यांच्या हस्ते होणार आहे.