Published on
:
08 Feb 2025, 4:54 pm
Updated on
:
08 Feb 2025, 4:54 pm
कासारवाडी : येथील गावाच्या उत्तरेस चेचरे मळ्यातील शेतात बिबट्याच्या बछड्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले. याची माहिती वनविभागाला मिळताच ड्रोनच्या साह्याने रात्री शोध घेतला.
स्थानिक शेतकऱ्यांच्या कडून मिळालेली माहिती अशी कासारवाडी येथील शिवाजी चेचरे व रेखा चेचरे हे दापत्य दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुळीक मळ्याशेजारील आपल्या शेतात ज्वारी पिकास पाणी देत असताना पिकातून आवाज येऊ लागला. आवाजाच्या दिशेने दोघे गेले असता त्यांना बिबट्याचा बछडा निदर्शनास आला. त्यानंतर ते घाबरून तेथून निघून गेले. शेतात बछडा असल्याची माहिती त्यांनी वन विभागाला कळवली. यानंतर वनवभागाच्या रेस्क्यू टीमने येऊन त्याची पाहणी केली. रेस्क्यू टीम रात्री उशिरापर्यंत ड्रोन सोडून पाहणी करत होते. यामुळे स्थानिक शेतक-यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.