घरगुती गॅस अवैधरीत्या रिक्षामध्ये भरण्यात येणाऱ्या सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकला.Pudhari Photo
Published on
:
08 Feb 2025, 2:41 pm
Updated on
:
08 Feb 2025, 2:41 pm
जळगाव : घरगुती गॅस अवैधरीत्या रिक्षामध्ये भरण्यात येणाऱ्या सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून 1लाख 70 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सकाळी भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर अवैधरित्या रिक्षामध्ये गॅस भरताना स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचाऱ्यांनी धाड टाकून 27 गॅस हंडी, एक रिक्षा पंप व इतर साहित्य असा 1लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी शेख नौशाद शेख नजीर, रवींद्र चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.