धम्मचक्र प्रवर्तन दिनी इर्विन चौक, भीमटेकडीवर उसळला भीमसागर:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विविध कार्यक्रम

4 days ago 3
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन), भीम टेकडी येथे एकत्र येत ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा केला. या वेळी भिक्खू संघ, समता सैनिक दल तसेच विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने बुद्ध विहार, भीम टेकडी परिसरात कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भीम अनुयायांनी शुभ्र वस्त्र परिधान करून तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होऊन अभिवादन केले. सम्राट अशोक विजयादशमीचे औचित्य साधत १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच लाखांपेक्षा जास्त अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. भारतात लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो. शनिवारी मध्यरात्रीपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथे बौद्ध अनुयायी महामानवांना अभिवादनासाठी एकत्र आलेत. तसेच सकाळी ८ पासून या ठिकाणी हजारो भीम अनुयायांनी गर्दी केली होती. विविध आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, संघटनांनी सामाजिक उपक्रम राबवत अनुयायांसाठी पाण्याची, अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. तसेच अन्य संघटनांकडून बुद्धभीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील यशोदा नगर परिसरातील भीम टेकडी येथेही हजारोंच्या संख्येने भीम अनुयायांनी एकत्र येऊन बाबासाहेब व भगवान बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा संघाच्या वतीने शनिवारी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धम्मदीक्षा सोहळा आणि बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी प्रशासकीय क्षेत्रात निवड झालेल्या आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच प्रमुख पाहुण्यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पवित्र ग्रंथ देऊन सन्मान केला. विशाल धम्म मंचावर दीक्षाभूमीचे कटआउट आकर्षक ठरले होते. इर्विन चौकामध्ये धम्मदीक्षा सोहळा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article