नकारात्मक बातमी:‘आय वॉँट टू रिस्टार्ट’ लिहून पोलिस उपायुक्त नांदेडकर यांच्या मुलाने केली आत्महत्या

4 days ago 3
पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एक मुलाने बेडरूममधील आरशावर स्केच पेनने ‘आय वाँट टू रिस्टार्ट’ या शब्दांसह काही ओळी लिहून आयुष्याची अखेर केली. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला. साहिल शीलवंत नांदेडकर (१७) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. साहिलने शनिवारी रात्री आई-वडिलांसोबत जेवण केले. नंतर त्यांच्यासाेबत रात्री साडेबारापर्यंत गप्पा मारल्या व झोपण्यासाठी खोलीत गेला. सकाळी साडेसहाच्या सुमारास वडील त्याला उठवण्यासाठी गेले. त्याने खोलीचा दरवाजा उघडला नाही. यामुळे ते खिडकीतून आवाज देण्यासाठी गेले असता साहिलने गळफास घेतल्याचे दिसले. उपायुक्त नांदेडकर यांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने साहिलला लटकलेल्या स्थितीतून खाली उतरवत तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी साहिलला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तिन्ही विषयांच्या शिकवणीत साहिल नांदेडकर होता टॉपर साहिल नांदेडकर हा बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. भविष्यात त्याला आयआयटीमधून शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्याने तीन ठिकाणी खासगी शिकवणी लावली होती. तिन्ही विषयांच्या शिकवणीत तो टॉपर होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या खोलीतल्या आरशावर स्केच पेनच्या साहाय्याने ‘आय एन्जाॅइड धिस लाइफ अँड बाॅडी. आय वाँट टू रिस्टार्ट. आय अॅम नाॅट क्विटिंग. लव्ह यू बोथ,’असे लिहिल्याचे आ‌ळढून आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article