नवदृष्टी लाभलेल्या ज्येष्ठांना मतदान करण्याचे आवाहन:मोफत नेत्रतपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

3 days ago 1
फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने झालेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या नवदृष्टीच्या माध्यमातून मतदान करणार असल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. फिनिक्सच्या वतीने नागरदेवळे (ता. अहिल्यानगर) येथे झालेल्या या शिबिराला महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या माध्यमातून ४८ ज्येष्ठ नागरिक, तर ५३ महिलांवर मोतीबिंदू व काचबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया के. के. आय बुधराणी हॉस्पिटल, पुणे येथे करण्यात आल्या. शस्त्रक्रिया होऊन ज्येष्ठ नागरिक व महिला शहरात परतले असता, फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी त्यांचे स्वागत केले. मिळालेल्या नवदृष्टीने विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांनीही मिळालेल्या नवदृष्टीतून चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प केला. आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीहीन रुग्णांना दृष्टी मिळण्यासाठी जिल्ह्यात फिनिक्स फाऊंडेशनने मोठी चळवळ उभी केली आहे. शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकातील ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेतले जात असल्याचे बोरुडे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article