नवरात्री 2024 : नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल

1 hour ago 1

वाहतूक मार्गात बदलpudhari news

पुढारी वृत्तसेवा

Published on

03 Oct 2024, 4:33 am

Updated on

03 Oct 2024, 4:33 am

नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात 3 ते 12 ऑक्टोबरदरम्यान वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या वेळी पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) यादरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. गर्दी वाढल्यास या भागातील वाहतूक व्यवस्थेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर यादरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर, नारायण पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई केली आहे. मध्य भागातील मंदिरांत दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळावर वाहने लावावीत.

भवानी पेठेतील श्री भवानीमाता मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टँड यादरम्यान रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई केली आहे. वाहनचालकांनी नेहरू रस्ता आणि परिसरात वाहने लावावीत. श्री भवानीमाता मंदिर परिसरातून जाणार्‍या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी मंदिर परिसरातील वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. सेनापती बापट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यास पत्रकारनगर चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे येणारी वाहतूक शिवाजी हौसिंग सोसायटी चौकातून सेनापती बापट रस्त्याच्या डाव्या बाजूने एकेरी करण्यात येईल. गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरून श्री चतु:शृंगी मंदिराकडे येणारी वाहतूक वेताळबाबा चौकातून दीपबंगला चौकातून, ओम सुपर मार्केटमार्गे गणेशखिंड रस्त्याकडे वळविण्यात येईल. कॉसमॉस जंक्शनकडून सेनापती बापट रस्त्याकडे येणारी वाहने पॉलिटेक्निक मैदानावर पार्क करावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

महालक्ष्मी मंदिर परिसरात उद्या अथर्वशीर्षपठण

सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात उद्या शुक्रवारी (दि.4 ऑक्टोबर) पहाटे पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत महिलांचा एकत्रित अथर्वशीर्षपठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तात्पुरता वाहतूक बदल केला आहे. जेथे चौकाकडून येणार्‍या वाहनांना बाजीराव रोडवरील जमनालाल बजाज चौक ते सावरकर चौक या मार्गावर प्रवेश बंद केला आहे. या वेळी वाहनचालकांनी जमनालाल बजाज चौकातून पुरम चौकाकडे जावे. मित्रमंडळ चौकाकडून येणारी वाहतूक सावरकर चौकापासून पुरम चौकाकडे बंद करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहनांना सिंहगड रोड जंक्शन चौकाकडे वळविण्यात येईल. सिंहगड रस्त्याने येणार्‍या वाहनांना सावरकर चौकातून पुरम चौकाकडे प्रवेश बंद असणार आहे. त्यांना मित्रमंडळ चौकातून व्होल्गा चौकमार्गे पुढे जावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article