नागपुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात दगडफेक, पोलीस जखमी

2 hours ago 1

नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या परिसरात संतप्त जमावाने दगडफेक केली. Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

05 Oct 2024, 7:15 am

Updated on

05 Oct 2024, 7:15 am

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या परिसरात शुक्रवारी (दि.४) रात्री दहा वाजताच्या दरम्यान संतप्त जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाली असून त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील यती नरसिंह आनंद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात विशिष्ट समुदायातील लोकांचा जमाव तक्रार घेऊन नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. तत्पूर्वी देखील एका शिष्टमंडळाने या प्रकरणासंदर्भात तक्रार दिल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. मात्र, यादरम्यान जमावातील काही जण संतप्त झाले. आणि त्यांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या परिसरात दगडफेकीला सुरुवात केली. त्यामुळे काही वेळातच येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.

नागपुरी गेटचे ठाणेदार हनुमंत उरलागुंडावार यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावातील लोक काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आले. जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या तसेच सौम्य लाठी चार्ज करण्यात आला. सध्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article