नाशिक- पुणे महामार्गावर एल ॲण्ड टी फाट्याजवळील उड्डाणपूलानजीक धावत्या छोटा टेम्पोने अचानक पेट घेतला(छाया : संदीप भोर)
Published on
:
06 Oct 2024, 4:12 am
Updated on
:
06 Oct 2024, 4:12 am
सिन्नर : नाशिक- पुणे महामार्गावर एल ॲण्ड टी फाट्याजवळील उड्डाणपूलानजीक धावत्या छोटा टेम्पोने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी (दि. 5) दुपारी 1.30 च्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहनातून बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
शहरातील रोशन पोपट लोणारे हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते नाशिकहून फळे घेऊन छोट्या टेम्पोने सिन्नरकडे येत होते. एल ॲण्ड टी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ अचानक वाहनाच्या पुढील बाजूला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रसंगावधान राखत ते वाहनातून बाहेर पडले. वाहनामध्ये सफरचंदाचे व इतर फळांचे बॉक्स त्यांनी तत्काळ अन्य वाहनधारकांच्या मदतीने खाली उतरविले. याबाबत अन्य वाहनधारकांनी एमआयडीसी अग्निशमन विभागाला माहिती देताच अग्निशमन अधिकारी अतुल सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमनच्या दोन बंबांनी अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर आग विझविली. आगीमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.