हिंगोलीतील 3 विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तयारी:इच्छुकांच्या पुण्यात झाल्या मुलाखती

2 hours ago 1
हिंगोली जिल्हयातील तीन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची जोरदार तयारी सुरु झाली असून पुणे येथे इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्या आहेत. यामध्ये वसमतमधून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर तर कळमनुरीतून जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचीच नांवे समोर आली आहेत. तर हिंगोलीतून तीन इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. हिंगोली जिल्हयात हिंगोली, कळमनुरी व वसमत विधानसभा मतदार संघ आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीमध्ये हिंगोली व कळमनुरी विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे, वसमत राष्ट्रवादीकडे आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयी झालेले राजेश नवघरे अजित पवार गटाकडे गेले आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीमधून लढविल्या जाणार असल्यातरी अद्यापही जागा वाटप झालेले नाही. त्यामुळे वसमतची हक्काची जागा कायम ठेऊन कळमनुरी किंवा हिंगोली विधानसभा आपल्याकडे सोडवून घेण्याची तयारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने केली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हि मागणी लाऊन धरली आहे. पुणे येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघातून माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे एकमेव नाव समोर आले असून त्यांनी मुलाखत दिली आहे. या शिवाय कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त करून मुलाखत दिली. हिंगोली विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव कोरडे, बंडू मुटकुळे यांनी उमेदवारी मागितली आहे. यावेळी राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जमाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ठाकूरसिंग बावरी, रवी गडदे, शिवाजी शिंदे पुयनेकर, वसंतराव पतंगे, शेख महेबुब, संचित गुंडेवार, अशोक हेंबाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article