शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्यासाठी संभाजी राजे येत आहेत, उदयनराजे कुठे आहेत?; संजय राऊत यांचा सवाल

1 hour ago 2

Sanjay Raut On Sambhaji Raje arabian oversea Statue Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारक बांधू अशी घोषणा केली होती. यानंतर त्यांनी मोठ्या थाटामाटात जलपूजनही केले होते. या घटनेला 8 वर्ष उलटून गेल्यानंतर अद्याप या स्मारकाचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे संतप्त झाले आहे. आज छत्रपती संभाजीराजे हे अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करणार आहेत. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे हे अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करणार आहेत, याबद्दल विचारणा करण्यात आलाी. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केले. छत्रपती शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत, त्या सर्वांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले.

“जगातील फार मोठं स्मारक बांधू”

शिवाजी महाराजांचे स्मारक शोधण्याची जबाबादारी या देशातील 11 कोटी जनतेची आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या स्मारकाचं पूजन झालं होतं. यासाठी भाजपने फार मोठा गाजावाजा केला होता. जगातील फार मोठं स्मारक बांधू, असं भाजपने म्हटलं होतं. जर संभाजीराजे छत्रपती स्मारक शोधत असतील, तर त्यांना पाठिंबा आहे, असे सजंय राऊत म्हणाले.

“आम्ही त्यांच्या पाठीशी”

संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, पण खरंतर त्यांच्यासोबत उदयनराजे भोसलेंनीही जायला हवं. जे कोणी छत्रपती शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत, त्या सर्वांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असेही संजय राऊतांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article