प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या समर्थनात म्हापशात हिंदू धर्मीय एकवटले

2 hours ago 1

प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या समर्थनात म्हापशात हिंदू धर्मिक एकवटलेPudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

06 Oct 2024, 9:56 am

Updated on

06 Oct 2024, 9:56 am

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

जुने गोवे येथील चर्चमध्ये असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डीएनए’ चाचणी करण्याची मागणी कायद्याला धरूनच प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे. त्यामुळे प्रा. वेलिंगकरांना अटक केल्यास संपूर्ण गोव्यात त्याचे पडसाद उमटतील, असा इशारा येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानाजवळ सर्व हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारला दिला आहे. हिंदू संघटना आणि समस्त हिंदू धर्मिय प्रा. वेलिंगकर यांच्या पाठीशी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानाजवळ गोव्यातील सर्व हिंदू संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते तसेच हिंदू बांधव मोठ्या संख्येने प्रा. वेलिंगकर यांच्या समर्थनार्थ जमले होते. यावेळी त्यांनी श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेऊन गार्‍हाणे घातले.

यावेळी वक्ते म्हणाले की, प्रा. वेलिंगकर यांनी कोणत्याही धर्माच्या भावना दुखावलेल्या नाहीत. यात जे सत्य आहे ते समोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. श्रीलंकेतील एका पत्रकारानेही हाच मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे कोणाच्याही मागणीवरून त्यांना अटक करणे गैर ठरेल. त्यांना अटक केल्यास संपूर्ण गोवा पेटून उठेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article