Buldana Urban Garba Festival: “फुलवंती” प्राजक्ता माळी आज बुलढाण्यात…

2 hours ago 1

बीसीसीएन/बुलडाणा अर्बन गरबा फेस्टीवल २०२४ चे मुख्य आकर्षण!

बुलडाणा (Buldana Urban Garba Festival) : मराठी सिने अभिनेत्री फुलवंती तसेच हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी (Prajakta mali) बिसीसीएन व बुलडाणा अर्बन गरबा च्या निमित्ताने रविवार ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी खास बुलडाणेकरांनासाठी भेटीस येत आहे. यामुळे (Garba Festival) गरबा खेळणाऱ्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

बिसीसीएन व (Buldana Urban) बुलडाणा अर्बन गरबा फेस्टीवलमध्ये (Garba Festival) पारंपारीक वेशभुषा व पोशाख परिधान करुन नटलेली बालगोपाल मंडळी, युवती आणि महिला भगिनींची संगीत गाण्यांच्या ठेक्यावर थिरकणारी पाऊलं, “अंबा माता की जय” आणि गरबा खेळणाऱ्या सर्वांचाच नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिसून आलेला उत्स्फुर्त प्रतिसाद अशा मंगलमय उत्साहवर्धक आणि धमाल बातावरणात बीसीसीएन/ बुलडाणा अर्बन गरबा फेस्टीवल २०२४ चे शुक्रवार ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी गरबा खेळण्यासाठी मुली व महिलांची एकच गर्दी झाली.

भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासोबतच शहरी व ग्रामीण भागातील मुली, महिला-युवतींना आपली (Garba Festival) गरबा दांडिया कला सादर करण्यासाठी व्यासपीठ व संधी मिळावी यासाठी बीसीसीएन (Buldana Urban) बुलडाणा अर्बन परिवाराचे वतीने मागील १८ वर्षांपासून गरबा फेस्टीवलचे थाटात आयोजन करण्यात येते. यावर्षी सुध्दा खास नवरात्रोत्सव निमित्त स्थानिक शारदा ज्ञानपीठचे मैदानावर ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत गरबा फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लहान व मध्यम अशा दोन गटात तसेच पारंपारिक वेशभूषा व पोशाखात गरबा खेळला जातो आहे. दुसऱ्या दिवशीच्या प्रारंभी मृणालिनी हर्षवर्धन सपकाळ यांचे शुभहस्ते दुर्गामातेचे पूजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते देवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी (Garba Festival) गरबा आयोजन समितीच्या अध्यक्षा  कोमलताई झंवर, कार्याध्यक्ष जितेंद्र कोठारी, युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक रविंद्र चोपडे, इक्वीटास स्माॅल फायनान्स बॅंकचे शाखा प्रबंधक संदीप धुमाळ,  मृणालिनी हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती होती. यावेळी गरबा आयोजन समितीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी उत्कृष्ठ गरबा खेळणाऱ्या लहान गटातील पाच कलावंतांना तर मोठ गट दहा, बेस्ट कॉस्च्युम एक, प्रिन्स ऑफ दि डे एक, सरगम टि तर्फे एक, चांडक लाईफ इन्शुरन्स तर्फे एक, ऑडीयन्स पोल मधून एक व हॉटेल खान्देशी यांच्या तर्फे एक बक्षीसे कोमलताई झंवर , चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर,  मृणालिनी हर्षवर्धन सपकाळ, रविंद्र चोपडे – शाखा प्रबंधक युनियन बँक ऑफ इंडिया, संदीप धुमाळ शाखा प्रबंधक इक्वीटास स्माॅल फायनान्स बॅंक, यांच्या शुभहस्ते स्पर्धेकांना गौरविण्यात आले.

गरब्याच्या शेवटी ओपण राउंडमध्ये उपस्थित मान्यवरांनी सुध्दा सैराटच्या झिंगाट गाण्यावर नृत्य केले. या (Garba Festival) गरब्याचे सुत्रसंचलन लालाभाई माधवानी यांनी केले, तर परिक्षक म्हणून राजेश बगाडे, गजानन रिंढे, सुनयना अंभोरे, सुरेश गोरे आदींनी परिश्रम घेतले. तर या गरब्याचा आनंद घेण्यासाठी अनंताभाऊ देशपांडे, बुलडाणा अर्बनचे सरव्यवस्थापक कैलास कासट व मुख्यालयातील सर्व विभाग प्रमुख, पदाधिकारी व कर्मचारी वृंद तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article