Minor girl Marriage: शाळेत टाकतो म्हणत नेऊन, अल्पवयीन मुलीचे लावले लग्न

2 hours ago 1

आई-वडिलांसह सासरच्या मंडळीवर पोलीस ठाण्यात नोंद गुन्हा

परभणी (Minor miss Marriage) : आई, आजीने खोटे बोलत शाळेत टाकायचे आहे, असे म्हणत छत्रपती संभाजी नगर येथे नेऊन एका अल्पवयीन मुलीचे लग्न (Minor miss Marriage) लावून दिले. त्यानंतर पतीने मुलीसोबत संबंध ठेवत अत्याचार केला. वेगवेगळ्या खोलीत डांबुन ठेवत मारहाण केली. ही घटना २० ऑगस्ट २०२४ ते २९ सप्टेंबर २०२४ या दरम्यान घडली. पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन आई – वडिल, सासु – सासरच्यासह जवळपास १८ जणांवर सेलू पोलिसात ५ ऑक्टोबरला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पिडित १५ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात आई आणि आजीने खोटे बोलून तिला शाळेत टाकायचे आहे, असे म्हणत छत्रपती संभाजी नगर येथे नेले. या ठिकाणी तिचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर पतीने बळजबरीने पिडितेसोबत संबंध ठेवले. तिला मारहाण करत वेगळ्या खोलीत डांबुन ठेवले. या दरम्यान पिडिता ही सेलू येथे आली असता आरोपीने पिडितेच्या घरी येऊन लाकडी पाटाने मारुन तिला जखमी केले. या (Minor miss Marriage) प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन आई – वडिल आणि सासरची मंडळी तसेच इतर पाच ते सहा जण मिळून जवळपास १८ जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि. कवाळे करत आहेत.

अल्वयीन मुलीचा विनयभंग

परभणी : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत वाईट हेतूने तिचा विनयभंग (Minor girl) करण्यात आला. विरोध केल्यावर आरोपीने अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. घडला प्रकार पिडितेने मावशीला सांगितल्यावर आरोपीने तिला देखील अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. ही घटना सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन आरोपी शंकर मोगरे याच्यावर सेलू पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोनि. चव्हाण करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article