Kalmanuri constituency: कळमनुरी मतदार संघात दिपक वडकुते यांच्या उमेदवारीसाठी पदाधिकारी आग्रही

2 hours ago 1

मनसे प्रमुख राज ठाकरेंची शिष्टमंडळाने घेतली भेट

हिंगोली (Kalmanuri constituency) : ओबीसी समाजाचा चेहरा असलेले सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त (Deepak Wadkute) दिपकराव वडकुते यांना (Kalmanuri constituency) कळमनुरी मतदार संघात मनसेतर्फे उमेदवारी देण्या बाबत मनसे पदाधिकारी आग्रही असून पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने (MNS Raj Thackeray) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दिपकराव वडकुते (Deepak Wadkute) यांना मनसेतर्फे उमेदवारी द्यावी. या मागणी करता शिष्टमंडळाने मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची भेट घेतली. शिष्ट मंडळात मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू कुटे, पक्षाचे सर चिटणीस हेमंत संभुस कामगार सेना महाराष्ट्र नव निर्माण सेना सरचिटणीस गजानन राणे यांचा समावेश होता. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वडकुते यांच्या उमेदवारीबाबत निश्चित विचार केला जाईल असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article