वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झाला.Pudhari photo
Published on
:
06 Oct 2024, 5:57 pm
Updated on
:
06 Oct 2024, 5:57 pm
नागपूर : देवलापार झिंझेंरीया परिसरात पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या लाखापूर शिवारात वाघाच्या हल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.6) घडली आहे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी घेवून जाणाऱ्या या गुराख्याला वाघाने एक किलोमीटर फरफटत नेले. अखेरीस या गुराख्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत गुराख्याचे नाव राजकुमार दशरथ खंडाते (वय ५२, खनोरा) असे आहे. या घटनेचा अधिक तपास वन अधिकारी करीत आहेत.