मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर आईचाही मृत्यू झाला.
Published on
:
06 Oct 2024, 6:50 pm
Updated on
:
06 Oct 2024, 6:50 pm
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील हिवरा फाट्यावर शनिवारी (दि.५) रात्री मुलाचा अपघातात होऊन मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी आईला दिली नव्हती. सकाळी मुलाचा मृतदेह आणल्यानंतर आईला याबद्दल सांगण्यात आले. मुलाचा मृतदेह समोर बघताच आईला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी (दि.७) सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कमलाबाई गणपतराव कदम (वय ७७) व किशन गणपतराव कदम अशी माय-लेकरांची नावे आहेत.
हिवरा येथील किशनराव गणपतराव कदम (वय ५०) यांचे शनिवारी रात्री अपघातात झाला. त्यांना गंभीर अवस्थेत अपघात स्थळावरून उपचारासाठी अर्धापूर येथे दाखल केली असता त्यांना डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. उत्तरीय तपासणी करून रविवारी (दि.७) सकाळी अकरा वाजता त्यांचे पार्थिव घरी आणले. ही घटना त्यांच्या आई कमलाबाई यांना कुटुंबाने कळू दिली नव्हती पण सकाळी अंत्यविधीसाठी मुलाचा मृतदेह पाहताच आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान आज (रविवारी) सायंकाळी सहा वाजता मुलाच्या विरहापोटी त्यांचाही मृत्यू झाला.