परभणी : मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर आईनेही सोडला प्राण

3 hours ago 1

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर आईचाही मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Published on

06 Oct 2024, 6:50 pm

Updated on

06 Oct 2024, 6:50 pm

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील हिवरा फाट्यावर शनिवारी (दि.५) रात्री किशन गणपतराव कदम यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना त्यांच्या आई कमलाबाई गणपतराव कदम यांना कळू दिली नव्हती पण सकाळी अंत्यविधीसाठी मुलाचे प्रेत पाहताच आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांना नांदेड येथील एका रुग्णालयामध्ये उपचार करता दाखल केली असता रविवारी (दि.७) सायंकाळी सहा वाजता मुलाच्या दुःखाच्या विरहात आईनेही प्राण सोडले.

हिवरा येथील किशनराव गणपतराव कदम (वय ५०) यांचे शनिवारी रात्री अपघातात झाला. त्यांना गंभीर अवस्थेत अपघात स्थळावरून उपचारासाठी अर्धापूर येथे दाखल केली असता त्यांना डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. उत्तरीय तपासणी करून रविवारी (दि.७) सकाळी अकरा वाजता मुलाचे पार्थिव घरी आणले. शनिवारी रात्री झालेल्या अपघाताबद्दल किशनराव यांच्या आईला घरच्यांनी माहिती होऊ दिली नव्हती पण मुलाचे प्रेत पाहताच आईला तीव्र ह्रदयविकाराचा झटका आला व त्यांना नांदेड येथे उपचाराकरता दाखल केले पण उपचारादरम्यान आज (रविवारी) सायंकाळी सहा वाजता (७५ वर्षीय) आईचीही मुलाच्या विरहापोटी प्राणज्योत मावळली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article