पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू झाला.
Published on
:
06 Oct 2024, 7:30 pm
Updated on
:
06 Oct 2024, 7:30 pm
कोल्हापूर : मार्केट यार्डपासून काही अंतरावर असलेल्या लोणार वसाहत परिसरातील एका कारखान्यातील पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. तैमूर शाहरूख मुल्ला असे त्याचे नाव आहे. रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
मोलमजुरी करणारे मुल्ला कुटुंबीय मूळचे पट्टणकोडोली परिसरातील आहे. मार्केट यार्ड परिसरातील एका कारखान्यात हे कुटुंबीय कामाला आहे. रविवारी कारखान्याला सुट्टी असल्याने सकाळी मुले आवारातच खेळत होती. तैमूर खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडला. हा प्रकार काही वेळाने वडिलांच्या निदर्शनास आला. मुलाला त्यांनी टाकीतून बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालय आवारात केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.