मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची विष पिऊन आत्महत्या:आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद

2 hours ago 1
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक येथील तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात रविवारी ता. ६ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी बुद्रूक येथील गोविंद जनार्दन खराटे (३०) यांचे पिंपरी बुद्रूक शिवारात अडीच एकर शेत आहे. या शेतावरच त्यांचे आई, वडिल, पत्नी, दोन मुले या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. गोविंद हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी झालेल्या आंदोलनात सक्रीय सहभागी झाले होते. या शिवाय सभा, बैठकांमधून त्यांनी स्वयंसेवक म्हणूनही काम केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी त्यांनी शेतात विषारी औषध पिले. त्यानंतर ते घरी आले. औषध पिल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना उलटी झाल्यानंतर त्यांनी विषारी औषध पिले असल्याचा उलगडा झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. त्या ठिकाणी ता. १ ऑक्टोबर रोजी उपचार सुुरु असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे भाऊ अनिल खराटे यांनी आज आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार शेख पुढील तपास करीत आहेत. जिल्हयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ३५ वी घटना आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article