Pusad Assembly Constituency: पुसद मध्ये “विठ्ठला कोणता झेंडा हाती घेऊ” अशी अवस्था!

2 hours ago 1

पुसद (Pusad Assembly Constituency) : पुसद विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे तर आचारसंहिता लागण्याची ही शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या दरम्यान गत पाच वर्षांमध्ये पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन लोकप्रतिनिधी मिळाले होते. एक विद्यमान (Pusad Assembly Constituency) पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक, तर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार निलय नाईक व काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार डॉ. वजाहत मिर्झा कधी नव्हे ते तीन लोकप्रतिनिधी पुसद तालुक्याला लाभले होते.

मतदारांची अपेक्षा या दरम्यान अशी होती की,” आता बारामती होईल ” मात्र अपेक्षा फोल ठरल्या. पाच वर्षांमध्ये पुसदचा विकास तर झालाच नाही. विकासाच्या नावावर शासनाच्या करोडो रुपयांच्या निधीला नख लावल्या गेले एवढं मात्र खरं. पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये एकही विकासात्मक दर्जात्मक युवकांना महिलांना बेरोजगारांच्या मजुरांच्या हाताला कायमस्वरूपी (Pusad Assembly Constituency) पुसद तालुक्यामध्येच काम उपलब्ध करून देण्याची क्षमता तिन्ही लोकप्रतिनिधीमध्ये दिसली नाही. केवळ टक्के बाजी मध्येच हे लोकप्रतिनिधी पाच वर्षे खेळलेले आहेत. असा पुसदकरांचा आरोप या लोकप्रतिनिधींवर आहे.

काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आ. तथा राज्य वख्ख बोर्ड अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा हे तर पुसद तालुक्यामध्ये कधीतरी दिसतात. या तिन्ही लोकप्रतिनिधींना आपल्या पूर्वजांच्या पुण्याइवरच आपली इमेज राखावी लागलेली आहे एवढं मात्र खरं. स्वकर्तृत्व शून्य असा मतदारांचा आरोप आहे. अखंड वीस वर्ष नागरिकांना आपल्या विविध माध्यमातून सामाजिक कार्यातून दायित्व निर्माण करून कुठलीही अपेक्षा न ठेवणारा एक सर्वसामान्य मुलगा ऍड शरद अप्पाराव मैंद यांनी मात्र (Pusad Assembly Constituency) पुसद तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसह नागरिकांचे मन जिंकलं असं दिसत आहे. संभाव्य विधानसभा निवडणुकीमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती अशी नेत्यांची अवस्था झालेली दिसत आहे.

पुसद तालुक्याला राजकीय नेत्यांचा मोठा वारसा आहे. शरद पवार यांचे निष्ठावंत माजी विधान परिषद आमदार दिवंगत डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सुपुत्र एड. आशिष देशमुख, पुसद अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष एड. शरद मैंद, माजी एज्युकेशन आयुक्त आदिवासी समाजाचे नेते रंगराव काळे, आदिवासी समाजाचे मोठे नेतृत्व माधवराव वैद्य, माजी मंत्री म्हणून नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र ययाती नाईक, (Pusad Assembly Constituency) पुसद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. इंद्रनील नाईक माजी मंत्री मनोहर नाईक यांचे चिरंजीव यांच्यामध्येच खरी लढत होताना दिसत आहे. मात्र ज्या आमदार खासदारांनी लोकप्रतिनिधींनी एक सप्टेंबर रोजी ढगफुटी झालेल्या वेळेस प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावरच नव्हे तर शेतातील नदी नाल्यांमध्ये फिरून मनापासून गोरगरिबांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम करणाऱ्या नेत्यांकडेच मतदारांचा कल झुकलेला दिसत आहे हे विशेष.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article