झापुकझुपुकचा बिगबॉसमध्ये डंका:एका खेडकर अशिक्षित तरुणाने महाराष्ट्राला लावले वेड, सुरजचा ऐतिहासिक विजय

2 hours ago 1
बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये गुलीगत सुरज चव्हाणने बाजी मारली आहे. सुरुवातीपासूनच सुरज चव्हाण जिंकणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती आणि झालेही तसेच त्यामुळे सुरज चव्हाणवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच सुरजने त्याच्या ओरिजिनल स्वभावाने व प्रामाणिकपणे सगळे खेळ खेळत सर्वांची मने जिंकली होती. विशेष म्हणजे सुरजवर झापुकझुपुक हा चित्रपट देखील बनविण्यात येणार आहे. बिग बॉसच्या घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचेही अनेकदा कौतुक झाले आहे. बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सुरजने मिळवली होती. त्यामुळे इतर दिग्गज स्पर्धकांपेक्षाही सुरज अनेकवेळा वरचढ ठरला होता. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सुरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सुरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सुरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवले. अखेर प्रेक्षकांनी दिलेल्या निर्णयानुसार सुरज विजेता ठरला. सुरज चव्हाण कोण आहे? सुरज चव्हाण सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. सुरज हा बारामतीमधला आहे. सुरजचे आयुष्य हे अत्यंत खडतर गेले आहे. लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यात घराची परिस्थिती देखील बिकट असल्याने त्याने केवळ आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. सुरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सुरजचा सांभाळ केला आहे. बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सुरज चांगलाच फेमस देखील झाला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article