Hingoli crime: दारूबंदी विभागाचे दारूवर छापे; तब्बल 1 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त

2 hours ago 1

नवरात्र उत्सवादरम्यान दारूबंदी विभागाची कामगिरी

हिंगोली (Hingoli crime) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ५ व ६ ऑक्टोंबरला अनेक ठिकाणी छापे मारून नऊ आरोपींवर (Hingoli crime) गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून अवैध दारूसाठ्यासह १ लाख ६५ हजार ८५० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ५ व ६ ऑक्टोंबरला निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क हिंगोली, भरारी पथक, दुय्यम निरीक्षक हिंगोली यांच्या पथकाने हिंगोलीसह कुरूंदा, टोकाई, माळवटा, वसमत शहर, बोराळा व करंजाळा परिसरात अवैध मद्य वाहतूक, विक्री विरूद्ध कारवाई करून नऊ आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले.

नऊ जणांवर गुन्हे दाखल

या कारवाईत देशी मद्याच्या ४४८बाटल, विदेशी मद्याच्या १७ बाटल असा एकूण १ लाख ६५ हजार ८५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही (Hingoli crime) कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, दुय्यम निरीक्षक टी.बी.शेख, कृष्णकांत पुरी, प्रदीप गोणारकर, ज्योती गुठ्ठे, जवान टी.एस.आडे, दशरथ राठोड, वाहन चालक वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article