शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तारांना आदित्य ठाकरेंची आठवण:आदिती तटकरेंचे नाव घेताना काय बोलून गेले!

2 hours ago 1
राज्य सरकारची महत्वकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना आणली असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र सत्ताधारी नेते त्याकडे लक्ष न देता महिनाभरापासून लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राज्यभर राबवत आहेत. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते आणि संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आठवण झाली. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे नाव घेताना अब्दुल सत्तार यांच्या तोंडून आदित्य ठाकरे यांचे नाव निघाले. छत्रपती संभाजीनगर येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजना मेळावा घेण्यात आला. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शहरात आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी भाषण केले. मात्र या दोन मिनिटांच्या भाषणात सत्तार यांना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची आठवण झाली. कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बालविकार मंत्री आदिती तटकरे यांची देखील उपस्थिती होती. स्वागत भाषणादरम्यान आदिती तटकरे यांचे आभार मानताना सत्तार यांनी त्यांचा आदित्य ठाकरे असा उल्लेख केला. हातात चिट्ठी असताना देखील सत्तार यांनी चुकीच्या नावाचा उल्लेख केल्याने कार्यक्रमस्थळी एकच चर्चा होती. काय म्हणाले अब्दुल सत्तार? अब्दुल सत्तार आपल्या भाषणात म्हणाले की, महिला व बालविकास मंत्री आमच्या भगिनी यांनी लाडकी बहीण योजनेला झुकते माप दिले. त्यांनी राज्यातील बहिणीला कोणतीही कमी पडू दिली नाही. अशा आमच्या भगिनी आदित्य ठाकरे यांचेही मी आभार मानतो, असे सत्तार बोलून गेले. सत्तार यांच्या या वक्तव्याने एकच हषा पिकला. महायुती सरकारकडून राज्यभर कार्यक्रम राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. त्या अनुषंगाने सर्वच राजकीच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुती सरकार आपण आणलेल्या योजनांची लोकांना माहिती व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लाडकी बहीण योजना ही त्या योजनांपैकीच एक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महिनाभरापासून राज्यभर लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घेतले जात आहेत. आज छत्रपती संभाजीनगर येथे लाडकी बहीण योजना मेळावा घेण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article