फलटणमध्ये पेटले राजकीय वातावरण:रणजीतसिंहांनी रामराजेंच्या आव्हानावर केला गौप्यस्फोट

2 hours ago 1
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील नेते रामराजे निंबाळकर यांनी शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रामराजे निंबाळकर हे अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र यावेळी त्यांनी भाजपवर तसेच भाजप नेते व माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रणजीतसिंह यांनी हिंमत असेल अपक्ष लढवून दाखवावे असे आव्हान देखील रामराजे यांनी दिले होते. रामराजे निंबाळकर यांनी दिलेल्या आव्हानाला रणजीतसिंह निंबाळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामराजे निंबाळकरांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. कदाचित ही अफवा देखील असू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीच्यावेळी सुद्धा रामराजे यांनी तुतारी वाजवली होती. आता देखील ते तुतारीच वाजवणार असल्याचे रणजीतसिंह निंबाळकर यांनी म्हणले आहे. फलटण येथे रेल्वेच्या कामाची पाहणी करताना त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना रणजीतसिंह निंबाळकर म्हणाले, फलटण कोरेगाव विधानसभा वरिष्ठांनी सांगितली तर आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, फलटण येथील कार्यकर्त्यांची रामराजे निंबाळकरांनी तुतारी हातात घ्यावी अशी इच्छा असल्याचे रामराजे यांचे पुतणे व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे निंबाळकरांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी अर्थात शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या तसेच कार्यकर्ते देखील रामराजे निंबाळकर यांना तुतारी हातात घेण्यासाठी मागे लागले असल्याचे समजते. मात्र शनिवारी रामराजे निंबाळकरांनी कार्यकर्त्यंची सभा घेत आपली भूमिका स्पष्ट करत आपण अजित पवारांच्या सोबतच राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांची भाजप पक्षावर असलेली नाराजी देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article