Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांचे पोहरादेवीत स्वागत

2 hours ago 1

मानोरा (Prime Minister Narendra Modi) : बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा विरासत नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दि. ५ ऑक्टोंबर रोजी दौर्‍यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे हेलिपॅडवर आगमन होताच भाजपाचे युवा नेते ऍड ज्ञायक पाटणी यांनी त्यांचे स्वागत करून आकांक्षीत वाशीम जिल्हा सह मतदार संघातील विकासात्मक मुद्यावर संवाद साधला.

भारतीय जनता पार्टी पक्षाचे कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे दिवंगत आमदार लोकनेते राजेंद्र पाटणी यांचे चिरंजीव भाजपाचे युवा नेते ऍड ज्ञायक पाटणी हे मतदार संघात आपल्या वडिलांचे विकासात्मक गुण अंगिकारून मागील तीन वर्षांपासून भाजपा पक्ष वाढविण्याकरिता कार्य करीत आहे. सध्याही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून दिवंगत वडिलांचा विकासासाठी निधी आणून मतदार संघाचा विकास करीत आहे.

पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे पोहरदेवीत आगमन होताच त्यांचा सत्कार करून ओळख देत ऍड पाटणी यांनी विकासात्मक मुद्यावर संवाद साधला. यावेळी त्यांचे समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्याम बढे, तालुकाध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रा सुनिल काळे आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article