Karhandla Sanctuary: उमरेड- पवनी- कऱ्हांडला अभयारण्यात पत्रकारांचा अभ्यास दौरा

2 hours ago 1

भिवापूर (Karhandla Sanctuary) : उमरेड -पवनी – कऱ्हांडला अभयारण्य आणि वनविभाग नागपूर प्रादेशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह दि.1ते 7 आक्टोंबर साजरा करण्यात येत आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने क-हांडला सफारी कार्यालय येथे पत्रकारांसाठी अभ्यास दौरा रविवारी दि.06आयोजित केला होता. या अभ्यास दौ-यात भिवापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप राउत, उमरेडचे पत्रकार विनोद मेश्राम, प्रदीप लोखंडे, जोगेंद्र सरदारे, राजेश जांभुळे,अमर मोकाशी, नरेंद्र ढोणे , सतीश तुळसकर,आदी उपस्थित होते.

सहायक वनसंरक्षक अधिकारी यशवंत नागुलवार, आरती उके वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनात, आरएफओ एल.एन.बंसोड, दिनेश नंदेश्वर,संजय खडोदे, सुरेश राठोड,आर.एल.मोहुर्ले, नीता भालेराव, सुरेखा वैद्य, मंगेश गिरडकर यांनी वन्यजीव सप्ताह संबंधी माहिती दिली. वन्यजीव सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात प्रियवदा विद्यालय सालेशहरीच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून (Karhandla Sanctuary) वन्यजीव जनजागृती केली. गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान ,निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

सप्ताहाच्या सहाव्या दिवशी एक पेड मॉ के नाम अंतर्गत पत्रकार प्रदीप राउत, विनोद मेश्राम व सतीश तुळसकर यांचे हस्ते (Karhandla Sanctuary) क-हांडला अभयारण्य गेट जवळ वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी अभयारण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article