Bigboss Marathi : पाचव्या पर्वाचा विजेता 'सुरज चव्हाण'वर बक्षिसांचा वर्षाव!

2 hours ago 1

Published on

06 Oct 2024, 4:20 pm

Updated on

06 Oct 2024, 4:20 pm

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी शोचे यंदाचे पर्व सीझन प्रचंड गाजला आहे. या पाचव्या सीझनचा विजेता गुलीगत धोका फेम सुरज चव्हाण ठरला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बिग बॉस मराठी सीझनच्या विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. यंदाचे पर्व 28 जुलै रोजी सुरु झाले. हे पर्व 14 आठवडे म्हणजे 70 दिवसांनी रविवारी (दि. 6) संपुष्टात आले. यंदाच्या सीझनला महाराष्ट्राने भरभरुन प्रेम दिलं. टीआरपीच्या बाबतीत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनने आधीच्या सीझनचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. Bigboss Marathi

विजेत्याला मिळाली ही बक्षिसे

यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरलेल्या बारामतीच्या विजेत्या सुरज चव्हाणवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहेत. त्या जेतेपदासाठी बिग बॉसकडून 14 लाख 60 हजार, पु.ना.गाडगीळ यांच्यामार्फत दागिने खरेदी करण्यासाठी 10 लाखांचे व्हाऊचर तसेच एक इलेक्ट्रीक बाईक देण्यात आली आहे. Bigboss Marathi

आता सुरज चव्हाण झळकणार मोठ्या पडद्यावर

बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण याला अनेक बक्षिसांसह एक सर्वात मोठे बक्षिस मिळाले आहे. तो आता छोट्या पडद्यावरुन थेट मोठ्या पडद्यावर त्याची छाप सोडणार आहे. ग्रँड फिनालेमध्ये पाहूणे म्हणून आलेल्या केदार शिंदे यांनी त्याच्यासोबत मराठी चित्रपट करण्याची घोषणा केली आहे. तसेच त्या चित्रपटाचे नाव 'झापूक झुपूक' असणार असल्याची माहिती देखील केदार शिंदे यांनी शोमध्ये दिली. Bigboss Marathi

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article