संभाजीराजे मुंबईत धडकले; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट
Published on
:
06 Oct 2024, 8:15 am
Updated on
:
06 Oct 2024, 8:15 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम 8 वर्ष होऊनही सुरु झालेले नसल्याने स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला अशी हाक देत संभाजीराजे यांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.