निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्र सज्ज:21 विधानसभासाठी 11,421 बॅलेट युनीट, प्रत्येकी 8,462 कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅटचे वितरण
2 days ago
1
पुणे जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असून जिल्ह्यात २१ विधानसभाकरीता ११ हजार ४२१ बॅलेट युनीट तर प्रत्येकी ८ हजार ४६२ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी साहित्याचे वितरण श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट यात्री निवासस्थान-२, गोळेगाव येथून करण्यात आले. यावेळी प्रत्येकी ३५६ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट वितरित करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील अन्य मतदार संघातील साहित्य वितरण केंद्रे व वितरीत करण्यात आलेले साहित्य: आंबेगाव विधानसभा मतदारसंघ - शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खु.- प्रत्येकी ३४६ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट. खेड आंळदी विधानसभा मतदारसंघ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु तालुका क्रीडा संकुल, तिन्हेवाडी- प्रत्येकी ३८९ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट. शिरुर विधानसभा मतदारसंघ - महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, गोदाम क्र. ३ कारेगाव, रांजणगाव एमआयडीसी- प्रत्येकी ४५७ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट वितरण करण्यात आले. दौंड विधानसभा मतदारसंघ - जुने शासकीय धान्य गोदाम, मदर तेरसा चौक, नगर मोरी, दौंड- प्रत्येकी ३१३ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट. इंदापूर विधानसभा मतदारसंघ- शासकीय धान्य गोदाम, इंदापूर- ६७४ बॅलेट युनीट आणि प्रत्येकी ३३७ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट. बारामती विधानसभा मतदारसंघ- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, एमआयडीसी, बारामती- ७७२ बॅलेट युनीट, प्रत्येकी ३८६ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट. पुरंदर विधानसभा मतदारसंघ - नवीन प्रशासकीय इमारत आवार, सासवड- ८३६ बॅलेट युनीट, प्रत्येकी ४१८ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट. भोर विधानसभा मतदारसंघ - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर, जुनी पंचायत समिती सभागृह वेल्हे, जिल्हा परिषद शाळा कुरण खुर्द (पानशेत) व राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारअंबोली, ता. मुळशी- प्रत्येकी ५६४ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट. मावळ विधानसभा मतदारसंघ - नुतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, तळेगाव-दाभाडे- प्रत्येकी ४०२ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट. चिंचवड विधानसभा मतदारसंघ - स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव- १ हजार १२८ बॅलेट युनीट, प्रत्येकी ५६४ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट. पिंपरी विधानसभा मतदारसंघ - ऑटो कल्स्टर अँड रिसर्च सेंटर, चिंचवड - प्रत्येकी ३९८ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)