निसर्ग संरक्षणासाठी पुढे आली 'वॉर':साप, घोरपड, माकड, कबुतरांना जीवदान वन्यजीव सप्ताहातील कार्यक्रम

5 days ago 2
निसर्ग संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल यासाठी सदैव कार्यरत राहणाऱ्या वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटीच्या (वॉर) पदाधिकाऱ्यांनी साप, घोरपड, माकड, मसन्याऊद यासह कबुतर व इतर पक्ष्यांना जीवदान दिले. वनखात्याने आयोजित केलेल्या वन्यजीव सप्ताहानिमित्त वॉरच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात पशु-पक्ष्यांना जीवदान हा महत्वाचा कार्यक्रम होता. त्यामुळे आठवडाभरात शहराच्या विविध भागांतून पकडण्यात आलेले सरपटणारे विविध पशु-पक्षी जंगलात सोडण्यात आले. यामध्ये एक मसण्याउद, दोन जखमी माकड, चार घोरपडी, दोन अजगर, २२ धामण, प्रत्येकी नऊ नाग आणि पांदिवड, आठ मण्यार, तीन कुकरी, प्रत्येकी दोन तश्कर, हरणटोळ व कव़ड्या, एकेक पानदिवळ, गवत्या व मंजऱ्या साप, एक कबुतर आणि एक करकोचा पक्षी आदींचा समावेश आहे. वॉर संस्थेचे निलेश कांचनपुरे, अभिजित दाणी, दिनेश मदारी, आकाश कुरळकर, ऋतिक उईके, निखिल खडसे, प्रतिक माहुरे, श्रेयस इसळ, दुर्गेश इंगोले, पवन वानखडे, दुर्गेश इंगोले, गौरव पवार, डॉ. हष्रल सवळे, वेदांत इंगोले, गणेश जाधव, शुभम विघे, अतुल पुंड, दिनेश राजपुत आदींनी या अभियानात सहभाग नोंदवला. संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘ऑन कॉल’ सेवा देत साप पकडण्यासोबतच स्वत: वलगाव, पीडीएमसी, एसआरपीएफ कॅम्प, एमआयडीसी, मंगलधाम कॉलनी, सैनिक नगर, मेहरबाबा कॉलनी अशाप्रकारे शहर व ग्रामीण भागात पोहचून वन्यजीवांना जीवदान दिले. नागरिकांमध्ये जनजागरण वन्यजीव सप्ताहादरम्यान प्राणी व पक्षी यांना जीवदान देत असतानाच वॉर संस्थेने वन्यजीव विषयक कायद्याचीही माहिती दिली. भविष्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता अत्यंत प्राथमिक स्तरावरील उपायोजना, विषारी व बिनविषारी सापांची ओळख, प्राण्यांसोबतच इतर पशु-पक्षी मनुष्याचे मित्र कसे आहेत हेही समजावून सांगितले. सदर संस्था ही पर्यावरण जनजागृतीसाठी अहोरात्र काम करित असल्याने स्थानिक नागरिकांतर्फे पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article