पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्राचे खासे भरण्यासाठी महाराष्ट्रात येतात:आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे तर त्यांचे घर पेटवणारे- उद्धव ठाकरे

1 hour ago 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात त्यांच्या कंत्राटदार मित्राचे खिसे भरण्यासाठी येतात. अनेक प्रकल्पांची घोषणा होते पण प्रकल्प कुठे जातात हे माहिती नाही, केवळ मोठ-मोठ्या घोषणा होतात, पण प्रकल्पाचे लोकार्पण हो नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या ज्या कामांसाठी ते प्रकल्प पूर्ण झालेच नाही. कंत्राटदार आणि त्या मार्फत यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिशे भरले जात आहे. सर्व सामान्य माणसाच्या घरातील चूल मात्र पेटत नाही. आमचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारे हिंदुत्व आहे तर त्यांचे हिंदुत्व हे घर पेटवणारे हिंदुत्व आहे. भूमिपुत्रांचा मान राखला गेला पाहिजे उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप आणि आमच्यातील हा फरक लक्षात घेतल्यानंतर शिवसेना त्यांना का संपवायची हे तुम्हाला लक्षात येईल. जेव्हा काम बोलत असते तेव्हा आपण जास्त बोलण्याची गरज नसते आज माझ्या शिवसेनेचे काम बोलत आहे. शिवसेनेमुळे अनेक तरुणांना आणि तरुणींना नोकऱ्या लागल्या आहेत. प्रत्येक राज्यात भूमिपुत्रांचा मान राखला गेला पाहिजे. नुसत्या योजनाची घोषणेने प्रश्न सुटणार नाही रोजगार मिळाला पाहिजे. एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात जी गद्दारी झाली त्यानंतर एकही प्रकल्प सुरू झाला नाही. उलट आपण जे काही प्रकल्प आणले तेही प्रकल्प अस्थिर वातावरणामुळे राज्यात आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही फिती कापल्या तरी जनता भाजप आणि त्यांच्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दीड महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले सर्व गद्दार बेकार होणार आहेत, असा टोलाही त्यांनी शिंदे गटासह भाजपला लगावला. एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, असे म्हणत त्यांनी आपण कुणाला तिकीट देणार नाही हे स्पष्ट केले आहे. बेकारांमध्येदेखील आपला नंबर एक झाला असेल, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article