पराभव दिसताच ‘मविआ’चे नेते सैरावैरा; महिलांबाबत अभद्र टिप्पणी- चित्रा वाघ:खा. सुप्रिया सुळे आणि ॲड. यशोमती ठाकूर गप्प का?

1 day ago 2
विधानसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ‘मविआ’चे बहुतेक नेते सैरावैरा झाले आहेत. या वैफल्यातूनच त्यांच्यापैकी काहींनी महिलांबाबत अभद्र टिप्पणी केली आहे. मात्र असे असतानाही महिलांचे नेतृत्व सांभाळणाऱ्या सुप्रिया सुळे व त्यांच्या लहान बहिण ॲड. यशोमती ठाकूर का गप्प आहेत, हे कळत नाही , अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी व्यक्त केली . मंगळवारी सकाळी रिम्स हॉस्पिटलमध्ये अर्चना अडसड (रोठे) यांची त्यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोठे या भाजप महायुतीचे धामणगाव रेल्वेचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी आहेत. त्याच्यावर सोमवारी रात्री चाकू हल्ला झाला. सातेफळ जवळ ही घटना घडली. हा धागा पकडून वाघ म्हणाल्या, यापूर्वी नवनीत राणांच्या सभेत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्यावर खुर्च्या भिरकावण्यात आल्या, काठ्या, ब्लेडने वार केले गेले, थुंकण्यात आले. पण एकाही विरोधकाने या घटनेचा साधा निषेधही केला नाही. यापूर्वी ‘मविआ’च्या नेत्यांनी एका महिला उमेदवाराला माल म्हटले. दोन दिवसांपूर्वी अन्य एका उमेदवाराला बकरी संबोधण्यात आले. यातून त्यांनी महिलाविरोधी मानसिकता स्पष्ट होते. परंतु या पार्श्वभूमीवर राकाँपाच्या सुप्रिया सुळे किंवा काँग्रेसच्या ॲड. यशोमती ठाकूर या ‘ब्र’ शब्दही उच्चारल्या नाहीत, याचे मला आश्चर्य वाटते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article