प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. pudhari file photo
Published on
:
23 Nov 2024, 8:33 am
Updated on
:
23 Nov 2024, 8:33 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बच्चू कडू अचलपूर विधानसभा मतदारसंघातून महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून रिंगणात होते.
बच्चू कडू यांनी 1999 मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यावेळी त्यांचा 1300 मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीवेळी त्यांच्या अनेक मित्रांनी पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते. 2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले. त्यानंतर सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत.
आमदार झाल्यानंतर बच्चू कडू यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ या संघटनेची स्थापना केली. अपंग, शेतकरी आणि गरिबांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला होता.