पवारांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - दिलीप वळसे पाटील:ट्रम्पेटने काही मते घेतली, त्याचा लाभ स्वत:लाही झाल्याची दिली कबुली
1 hour ago
1
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती. प्रतिष्ठाणचा विश्वस्त या नात्याने मी त्या बैठकीला उपस्थित होतो. बैठकीमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाबाबत वेगवेगळ्या विषयांवर उपयुक्त चर्चा झाल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. ट्रम्पेट चिन्हाचा स्वत:लाही फायदा झाला, अशी कबुली वळसे पाटील यांनी दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची बैठक झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार प्रचारावेळी सभेत काय बोलले हे मी विसरलो आहे. या बैठकीत राजकीय विषयावर काहीही चर्चा झाली नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात काय घडले यावर चर्चा झाली. पण माझ्या स्वत:च्या निवडणुकीवर कोणतीही चर्चा झाली नाही. यंदाची निवडणूक वेगळ्या प्रकारची होती, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले. ट्रम्पेटचा फायदा मलाही झाला
अनेक मतदारसंघात पिपाणी चिन्हाला मते मिळाली, त्याचा लाभ तुम्हाला झाला का? या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्पेटने काही मते घेतली हे खरे आहे. त्याचा लाभ मलाही झाला. पण महाराष्ट्रातील बाकीच्या मतदारसंघात निवडणुकीत ट्रम्पेटचा लाभ झाला की नाही, यावर कोणतीही चर्चा झाली नाही., असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. राम शिंदेंच्या आरोपावर काय म्हणाले वळसे पाटील?
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी माझ्याविरोधात अघोषित करार झाला होता, असा आरोप राम शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, असा काही प्रकार झाला असेल, असे मला वाटत नाही. कारण मॅच फिक्सिंग करून निवडणुका लढायच्या नसतात. सरळ सरळ निवडणुका झाल्या आहेत. जो उमेदवार विजयी झाला, तोच विधानसभेत आला असेल. ट्रम्पेट चिन्हामुळे वळसे पाटलांचा निसटता विजय
विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांचा 1 हजार 100 मतांनी निसटता विजय झाला आहे. आंबेगाव मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्याविरोधात डमी उमेदवार उभा करण्यात आला होता. त्या अपक्ष उमेदवाराचे नाव देखील देवदत्त शिवाजी निकम असे होते आणि त्यांना ट्रम्पेट चिन्ह देण्यात आले होते. अपक्ष आणि डमी उमेदवार देवदत्त निकम यांना 2 हजार 950 मते मिळाली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)